चांदण्या रात्रीची ती, शीतल शीतल छाया..
तेजोमय सखे तुझी, निरागस ही काया....
तेजोमय सखे तुझी, निरागस ही काया....
चंद्र ही चक्रावला, तुझी असिम कांती बघून..
मुकाट्याने गेला, मग निराश होऊन निघून....
सोनसळी रूप तुझे, चंदेरी हा पेहराव..
नाजूक पाऊल पडे घेऊन, मखमलीसा ठेहराव....
कमनीय बांधा, आणि छटा मोहक लाजरी..
तू जिथे जाशी, तिथे दिवाळी होई साजरी....
तिरपा कटाक्ष भोळा, असे मस्तानीची अदा..
प्रसन्न टवटवीत चेहरा, तुझा दृष्टीस पडे सदा....
भ्रमर जसा सुमनाभोवती, सतत फेऱ्या मारी..
एक झलक पहाण्यास तुझी, लाखो मजनू दारी....
सुंदरता इथे संपते, अशी विधाताही देतो ग्वाही..
कोणीच नसे तुजसम, आणि कोणी होणे नाही....
-- वैभव फाटक..(२३/०६/२०११)
No comments:
Post a Comment