मराठी ब्लॉग विश्व

Sunday, 15 January 2012

फक्त श्वास काही....


येतील ते सुखाचे.....प्रारब्ध मास काही..
मुखामध्ये भुकेल्या.....पडतील घास काही....

ओथंब आठवांचे.....हृदयात दाटलेले..
छळतात लोचनांना.....रंगीन भास काही....

तू पाठ का फिरवली.....घेऊन आणभाका..
ज्यांस साथ ना तुझी ते.....अपुरे प्रयास काही....

ऐश्वर्य ते नको रे.....ना पाहिजेत सेवा..
जगण्यास मोकळे तू.....दे फक्त श्वास काही....

रेखाटल्यात प्रतिमा.....मी आजवर असंख्य..
पाहती तुझी प्रतीक्षा.....ते कॅनव्हास काही....

पुसतेस हाल मजला.....बेरंग जिंदगीचा..
उरलेच नाही तुजला.....वदण्यास खास काही....

वैभव फाटक ( ओढ गझलेची) (०९/०१/२०१२)

No comments:

Post a Comment