मराठी ब्लॉग विश्व

Thursday 19 January 2012

आई..


जिच्या विषयी लिहायला गेलो, तर शब्दही अपुरे पडतात.
कष्ट जिचे आठवताच मनात, दुःखाचे डोंगर दडतात...

ती आपल्या लहानग्या बाळाच्या, गळ्यातील ताईत आहे.
आपल्या बाळाची छोट्यातली छोटी, गरजही जिला माहित आहे...

ती लेकरासाठी उंच कड्यावरून, उडी टाकणारी हिरकणी आहे.
स्वामी तिन्ही जगाचाही जिचा, साता जन्माचा ऋणी आहे...

वृक्ष जसे रणरणत्या उन्हातही, देतात वाटसरुना सावली.
तसेच स्वतः दुःख झेलून सर्वा, सुखी ठेवते माउली...

लेकराचे सुख हे एकच मागणे, ती देवाकडे मागत असते.
त्याच्या सुखासाठी ती आपली, सर्व स्वप्ने त्यागत असते...

राव असो कि रंक त्याला आईचे ना ऋण फिटे.
थोर तिचे उपकार त्यापुढे आसमंत ही दिसे थिटे...

वेदने नंतर आठवणारा पहिला शब्द आई ग.
तुझ्या शिवाय माझ्याकडे बघणारे कोणी नाही ग.

वैभव फाटक ( २ मे २०११)

No comments:

Post a Comment